पेरु चा जँम
पेरूचा जँम
साहित्य :५-६अर्धवट पिकलेले पेरु,साखर
१लिंबू, पाव चमचा सायट्रीक अँसिड,पाव
चमच्या पेक्षा कमी सोडीयम ब्रेंझाइट
कृती:- सर्व प्रथम पेरु धुवुन पुसून घ्या
छोटे छोटे तुकडे कापून कढईत घालुन
फोडी बुडे पर्यन्त पाणी घालावं
आणि त्यात एक लहान लिंबाचे सालही
बारीक तुकडे करुन घालावं.
फोडी अगदी मऊ होई पर्यत शिजवाव्यात.
नंतर त्या फोडी पुरणयंञातुन बारीक करुन
घ्याव्यात.गराच्या पाऊणपट साखर गरात
घालुन तो मंद आचेवर शिजवावा. गर शिजल्यावर
त्यात सायट्रिक अँसिड घालावं.
एक किलो गरास पाव चमचा एवढं त्याचं प्रमाण
ठेवावं . तसेच जँम टिकवण्यासाठी सोडीयम
ब्रेंझाइट घालावं. आणि पुन्हा एकदा गर शिजवुन
घ्यावा.मिश्रण गार झाल्यावर बरणीत भरावा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: