अंजली काेमल प्रेमशंकर अग्रवाल या दाेन्ही बहिणींनी उत्तुंग यश मिळवले

जळगाव: अंजली काेमल प्रेमशंकर
अग्रवाल या दाेन्ही बहिणींनी उत्तुंग
यश मिळवले अाहे. अंजली हिने
रविवारी जाहीर झालेल्या बारावीच्या सीबीएसईच्या परीक्षेत ९६.२ गुण
मिळवले. तर तिची माेठी बहिणी
काेमल हिला गणित विषयात पीएच.
डी.साठी सव्वा काेटी रुपयांची अमेरिकेची फेलाेशिप मिळाली अाहे.
रेल्वे काॅन्ट्रॅक्टर असलेले प्रेमशंकर
अग्रवाल अाणि करुणा अग्रवाल
यांच्यासाठी दाेन्ही मुलींचे यश हे
अानंद देणारे ठरले अाहे. माेठी मुलगी
काेमल हिने चार वर्षांपूर्वी दहावीत
९७ टक्के गुण मिळवले हाेते. लहान
अंजली देखील अभ्यासात हुशार
असल्याने तिला किती गुण मिळतात,
याकडे त्यांचे लक्ष हाेते. अंजली हिने ९६.२ टक्के गुण मिळवत पालकांचा विश्वास खरा ठरवला. अंजली हिला डाॅक्टर, इंजिनिअरिंगमध्ये करिअर करता बाॅयलाॅजीत एमएससी करून पीएच.डी. मिळवून शिक्षिका व्हायचे अाहे.

काेमलला पीएच.डी.साठी अमेरिकेची फेलाेशिप

अंजलीची माेठी बहिण काेमल हिने नुकतेच हैद्राबाद येथील बीट्स पिलानी (बीअायटीएस) एमएससीचे शिक्षण पूर्ण केले अाहे. मॅथ्स विषयात ८.६१ सीजीपीए मिळवले अाहे. तिला अमेरिकेच्या जार्जेरिया येथे पीएच.डी.साठी एक काेटी ११ हजार रुपयांची फेलाेशिप मिळाली अाहे. ही शिष्यवृत्ती दरवर्षी २७ लाख रुपये (४१,६०० यूएस डाॅलर्स) याप्रमाणे चार वर्ष मिळणार अाहे. काेमल ही पीएच.डी.करिता अाॅगस्ट महिन्यात जाॅर्जेरियाला जाणार असल्याचे प्रेमशंकर अग्रवाल यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.