पेट्रोल डिटेल महागले
31 मे :पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आलीये. पेट्रोल प्रतिलीटर 1 रुपये 23 पैसे तर डिझेल 0.89पैशांनी महागलंय. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.15 दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्यामुळेसुखावलेल्या वाहनचालकांच्या खिश्याला पुन्हा कात्री बसणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलीये. 15 मे रोजी पेट्रोल प्रतिलीटर 2 रुपये 16 पैसे तर डिझेल प्रतिलीटर 2 रुपये 10 पैशांची कपात करण्यात आली होती. 15 दिवस उलटत नाहीतेच आज पेट्रोलच्या दरात 1 रुपये 23 पैशांची वाढ केलीये. डिझेलमध्ये मात्र 0.89 पैशांची वाढ केलीय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: