उकडीचे मोदक
******* साहीत्य *********
२ भांडी बासमती तांदूळ पीठ
.२ भांडी पाणी
चिमूटभर मीठ
१ चमचा लोणी किंवा साजूक तूप
अर्धा चमचा साखरसारणाचे जिन्नस
१ नारळ
पाव किलो गूळ
५० ग्रॅम खवा (आवडीनुसार)
अष्टविनायक दर्शनासाठी येथे टचकी मारा
********* कृती *********
पुरणासाठी असणारा नारळ थोडा भाजून घ्यावा (पाणी सुटू नये म्हणून) त्यात गूळ, खवा व १ चमचा तांदूळ पीठी घालावी.
याप्रमाणे पुरण आधीच तयार करून ठेवावे.
२ भांडी पाणी उकळत ठेवावे.
पातेल्यातील पाण्याला अर्थवट उकळी आल्यावर
त्यात लोणी, साखर घालावी. नंतर पाणीढवळून त्यात पीठ घालावे व उलथन्याच्या टोकाने एकाच बाजूने ढवळावे. झाकण ठेवून वाफ आणावी. पंचा ओला करून तयार झालेली उकड गरम असतानाच मळून घ्यावी. तयार झालेल्या उकडीचीपारी करुन त्यात पुरण भरावे व मोदकाचा आकार द्यावा. असे मोदक तयार करून १५-२० मिनिटे वाफवावेत.
हळदीच्या पानात वाफवल्यास स्वाद चांगला येतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: