हेयर ड्रायर वापरल्याचे तोटे

नमस्कार मित्रानो. कसे आहात
सुंदर दिसण्यासाठी हल्ली पायाच्या नखांपासून
 डोक्यावच्या केसापर्यत अनेक प्रयोग केले जातात. 
कारण एकच फँशनेबल दिसायचं.पण या प्रयोगामुळे
 कधीकधी फायदा होण्यापेक्षा नुकसानही होत.पण 
हे लक्षात येई पर्यत वेळ निघून गेलेली असते त्वचे
प्रमाणेच केसांवरही नाना प्रयोग केले जातात. 
स्टाईलच्या नावाखाली केसांमधलं मूळ सौंदर्यच हरवून जातं.
केस सरळ असले की अनेंकीना ते कुरळे करायचे असतात 
आणि कुरळे असले की स्ट्रेट करायचे असतात.केस सारखे
 धुण्याची सवय आणि केस सेकंदातमिनटात वाळवण्याची
 घाई. मग या प्रत्येक गोष्टीसाठी उपकरणांचा आधार घेऊन 
केसांशी अक्षरशः खेळलं जातं.


















हेअर ड्रायरचा उपयोग केसांसाठी केवळ ब्यूटीपार्लरमध्येच 
होतो असं नाही, त येता-जाता सोयिस्कर पडावं,छोट्याछोट्या
 गोष्टींसाठी पार्लरच्या फेर्या नकोत म्हणुन हा हेआर ड्रायर अनेक
जणी घरीच आणुन ठेवतात. कधीही केस धुवायचेत आणि हेअर
 ड्रायरनः वाळवायचेत  हे तर सर्रास होत.
पण ते महागात पडु शकतं,या संदर्भात अभ्यास करणार्यानी
 आपल्या अभ्यासातून हे सिध्द केलं आहे की हेआर ड्रायरमुळे
 केसांचं कधीही भरुन न येणारं नुकसान होतं सारखे सारखे केस 
धुण्यानं केसांची जी हानी होते त्याच्या दसपटहानी ही हेअर ड्रायरनं 
केस सुकवल्यामुळे होते.हेअर आर्यनिंग करताना जे उपकरण वापरलं 
जातं त्यामुळेही केस खराब होतात.
हा निष्कर्ष काढतानि अभ्यासकांनी त्यामागचं कारण सांगितलं आहे . 
हेअर ड्रायरमधली तसेच हेअर आर्यनमधली हवा अतिशय उष्ण आसते. 
त्याचा परिणाम केसातील पाण्यावर होतो .नखाच्या वरती त्वचेचा तसा
 पातळ पापुद्रा हा केसांवरही असतो.या पापुद्र्या मधे केसांना माँयच्शर
 पुरवणारं पाणी असतं. हेअर ड्रायरमधील गरम हवेनं या पाण्यात बुडबुडे 
निर्माण होतात. त्याचा परिणाम म्हणजे केसांवर ताण येतो आणि केस
 तुटतात.केस खराब होतात.केसातलं पाणी संपुन केस कोरडे होतात.
केसांना फाटे फुटतात.
तेव्हा हे लक्षात ठेवलेलं बरं की ,
केसांना नैसर्गिकरित्या कोरडं करुन हेअर ड्रायर टाळणं हा केस सुंदर
 ठेवण्याचा आणि करण्याचा उत्तम उपाय आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.