चकली कशी बनवावी.....
नग: साधारण २० ते २२ मध्यम चकल्या
साहित्य:१ कप चकलीची भाजणी
१ कप पाणी
१ टिस्पून हिंग
२ टिस्पून पांढरे तिळ
१/२ चमचा ओवा
१टेस्पून लाल तिखट
१ टिस्पून तेल
चवीपुरते मिठ
कृती:१) १ कप पाणी पातेल्यात उकळत ठेवावे.
त्यात हिंग, लाल तिखट, तेल, ओवा,
पांढरे तिळ आणि मीठ घालून ढवळावे.
२) पाणी उकळले कि गॅस बंद करावा,
चकलीची भाजणी घालावी आणि
ढवळावे. ७-८ मिनीटे झाकून ठेवावे.
३) कोमट पाण्याचा हात लावून पिठ मळावे.
४) चकलीच्या सोर्याला आतून तेलाचा हात
लावावा म्हणजे पिठ चिकटणार नाही.
सोर्यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून
चकल्या पाडाव्यात. मध्यम आचेवर चकल्या
तळून घ्याव्यात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: