अमेरिकेतील संग्रहालय घरीच पहा
आपण कोणत्याही वेगळ्या देशात,राज्यात,
शहरात गेलो की प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत
संग्रहालय ही गोष्ट असतेच.अनेकांना संग्रहालय
बृघायला फार कंटाळा येतो.पण अनेक लोकं जिथे जातो
आहोत,तिथल्या लोकांबद्दल, तिथल्या इतिहासाबद्दल
समजून घेण्यासाठी संग्रहालयांना नक्कीच भेट देतात.ही
संग्रहालये म्हणजे निसर्गाच्या,माणसाच्या कर्तृत्वाचे एक
प्रदर्शन आहेत असं वाटतं. ही संग्रहालये तिथल्या लोकांच्या
चंगल्या-वाईट वारशाचं प्रतिक बनून जातं.
जगभरात आशी अनेक संग्रहालये आहेत; पण काहींनी
स्वतःला बदलत्या काळानुसार बदललं आहे.
स्मिथसोनियन थसोनियन नावाचं जगप्रसिध्द संग्रहालय
बघायचं असेल तर ते पुर्वी प्रत्यक्ष वाँशिंग्टन डीसीमध्ये जाऊनच
बघायला लागत होते. आता तसं नाही ,स्मिथसोनियन संग्रहालय
आता आपल्या घरीच आँनलाईन बघता येईल .अमेरिकेला न
जाता आपल्या घरीच बसुन हे संग्रहालय पाहू शकता.
हे स्मिथसोनियन म्हणजे प्रत्यक्षात काय आहे?
तर हा एक ट्रस्ट आहे.जेम्स स्मिथसन हा ब्रिटिश शास्त्रज्ञ .
त्याच्या मृत्यूनंतर त्याने आपली सर्व धन संपती
आपल्या पुतण्याला देऊ केली त्याचा पुतण्या म्हणजे
हेनरी जेम्स हंगरफोर्ड.
१८३५ साली त्याच्या मृत्यूनंतर त्याचा कोणताही
वारस नसल्यामुळे ती अमेरिकन राष्ट्राला आर्पण झाली.
त्याला वारस नसल्यामुळे ते असे होणार हे त्याला माहीत होते .
म्हणून आपली संपत्ती सत्कर्मी लागावी म्हणून 'ही रक्कम
ज्ञानाच्या प्रचारासाठी आणि वृध्दीसाठी' वापरली जावी असं
त्याच्या मृत्यूपञात त्यानं लिहून ठेवलं.१८३८ साली
अमेरिकेलाही पाच लाख डालर्सची रक्कम मिळाली
.या रकमेबरोबरच,खूप मौल्यवान अशा वस्तूही मिळाल्या .
एवढी मोठी रक्कम मिळाल्यावर अमेरिकन काँग्रेसला
त्यांच नक्की काय करायचे, त्याचा उपयोग नक्की कसा
करायचा हे समजले नाही.'ही रक्कम ज्ञानाच्या प्रचारासाठी
आणि वृध्दीसाठी वापरली जावी' याचा नेमका अर्थ काय हे
आमेरिकन काँग्रेसला ठरवायला पुढची आठ वर्षे लागली.
याच्या मागेही एक कारण आहे
ते कारण म्हणजे लोकशाहीत ते निर्णय घेतले जातात ते
निर्णय जास्तीत जास्त लोकांच्या भल्याचां असला पाहीजे
म्हणुन निर्णय घेण्याला उशीर होतो.
ह्या संग्रालयाच्या बाबतीत असेच झाले. जवळजवळ
आठ वर्षांनी या रकमेतून एक संग्रहालय उभारावं असं
काँग्रेसने ठरवले.
१९४९ साली सुरु झालेल्या या ट्रस्टच्या संग्रहालयाला
आता १६८ वर्षेमध्ये या संग्रहालयाच्या आनेक शाखा
निर्माण झाल्या.तब्बल २००हून आधिक आणि जवळ
जवळ अमेरिकेच्या प्रत्येक राज्या मध्ये विषयानुरुप
अनेक संग्रहालये, उद्यानं बांधली गेली पण आजच्या
काळाला आनुसरुन घडलेलं सर्वात मोठे काम
म्हणजे वेबसाइट आणि यू-ट्युब चँनलचे.
या यू-ट्युब चँनेल वर आपण कायम बघतो त्याप्रमाणे
मोठमोठ्या डाँक्युमेंटरीज नाहीत. इथे आपल्ल्याला
पाहायला मिळतील २ किंवा ३ मिनिटांच्या छोट्या
छोट्या फिल्म्स.याचे विषयही भन्नट आहेत.इथे तुम्हाला
राणी व्हिक्टोरियाने आपल्या कँमेराने काढलेली छायाचित्रे
बघायला मिळतील .तसेच राणीने केलेले पहिले रेडिओ
वरील भाषण ऐकायला मिळेल. त्यांनी, नुकताच पोस्ट केलेला
व्हीडीयो पण मस्तं आहे.त्याचा विषय आहे की पुर आला तर
गटारांना तुबंण्या पासुन कसं वाचवायचे. त्यांनी हा व्हिडीओ
आमेरिकेतिल टेक्सास मध्ये आलेल्या पुराच्या संबंधी टाकला
आहे.या बरोबरच आवडत्या विषयानुसार आपण या फिल्म्स
बघू शकता शकता.
या वेबसाइटळर कसली माहीती नाही, ते सांगा !
एखाद्या बाँटनीस्टला जगभरातल्या फुलांची यादी
हवी असली तर ती आहे.त्याच बरोबर त्याचे
स्पेसीमन कुठे पाहायला मिळेल ही माहीती
देखील काही क्लिक्सवर उपलब्ध आहे.
अश्म युगातील मानवाच्या हाडांबद्दल ,
तेव्हाच्या प्राण्यांबद्दल, इत्थंभूत माहिती
तुम्हाला मिळेल. 'हाडाच्या' शास्ञज्ञांनाही
वेबसाइट म्हणजे पर्वणीच आहे! पण इथे गोष्टी
काशा शोधायच्या हे माञ कळलं
पाहीजे.
यू-ट्यूब चँनल - स्मिथसोनियन चँनल
स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटची वेबसाइट-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: