प्रथमोपचार (First aid )

प्रथमोपचार (First aid )
जगतांना किंवा काम करतांना आपल्या किंवा
दुसऱ्याच्या निष्काळजी किंवा इतरत्र कारणा
मुळे लहान मोठे अपघात होत असतात. अशा
वेळी अपघात ग्रस्त व्यक्तीस त्वरीत अराम
मिळुन कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये
म्हणुन डॉक्टरांकडे जाण्यापुर्वी केल्या जाणाऱ्या
उपचारास प्राथमिक उपचार किंवा प्रथोमोपचार
असे म्हणतात. प्रथमोपचार साधारण व्यक्ती सुध्दा
करु शकतो,पण त्याला प्रथमोपचाराची माहीती
असणे अवश्यक .

* प्रथमोपचारांची पध्दती:-

१)अपघात झालेल्या व्यक्तीला प्रथम धीर द्यावा.
     त्याचे मनोबळ वाढवावे.
२)अपघात झालेल्या व्यक्ती भोवती ,गोधळ करु
    नये.
३)जखम झाल्यास  त्या ठिकाणी  रक्तप्रवाह चालु
    असल्यास तो त्वरीत  बंद करावा
४)श्वासोश्वास बंद झाल्यास कृत्रिम पध्दतीने श्वासाची
     उपाय योजना करावी.
५)अपघात झालेल्या व्यक्तीला शुध्द हवेच्या ठिकाणी
     घेऊन  जावे.
६)लवकरात लवकर डॉक्टरांची व्यवस्था करावी ,
    किंवा दवाखान्यात न्यावे.
* प्राथमिक उपचार *
१)खरचटने अगर कापणे:-
       धारदार अथवा टोकदार हत्याराने कापले जाऊन
रक्त वाहु लागल्यास त्वरीत स्पीरिटने धुवावे,नंतर त्यावर
आयोडीन  लावणे व पट्टी बांधावी.
२) जळणे:-
         गरम किंवा तापलेल्या उष्ण वस्तूच्या स्पर्शाने  तसेच
गरम द्रव्य पदार्थाने एखाद्या  ठिकाणी  भाजल्यास त्यावर
थंडपाणी टाकावे.भाजलेल्या भागात स्पिरीटने धुवावे.
३) डोळ्यात मातीचे,धातुचे ,इतर कण गेल्यास :-
      ड्रीलिंग किंवा ग्राइडींग क्रिया करत आसतांना   
     डोळ्यात धातुचे अथवा इतर कण गेल्यास तसेच
  वेल्डींग झाल्या नंतर डोळ्यांना त्रास जाणवू लागल्यास
   डोळ्यांना प्रथम त्वरीत थंडगार पाण्याने धुवावे.अथवा 
   गुलाब जल वापरावे. गाईचे किंवा शेळीचे दूध टाकावे.
४) हाड मोडणे:-
       जड वस्तू हाता-पायावर पडल्यास व इतर कोणत्याही
कारणात्सव शरीराचे कोणतेही हाड मोडले.तर त्या
मोडलेल्या हाडाचीषहालचाल होऊ देवु नका,मोडलेल्या
भागावर नरम लाकडी फळ्यांचा सर्पोट द्यावा व रूग्णाला
दवाखान्यात नेवून जावे.
५) शॉक बसणे:-
स्विच अॉन असताना कोणत्याही उघड्या वायर्स
ला स्पर्श  होणे , शॉर्ट सर्कीट असणे, अर्थिगं व्यवस्थित
नसणे इत्यादी कारणामुळे शॉक बसतो. अशा वेळी डायरेक्ट स्पर्श न करता,त्याच्या संबंधी वायर लाकडाने
दूर कराव्यात व कृत्रिम शासोश्वास द्यावा.

*प्रथोमोपचार पेटी(first aid box)
१)बेनस्वाईन,आयोडीन,किंवा मरक्यूरी स्क्रोम बाटली,
२)अल्कोव्होल किंवा स्पिरीट
३)लाकडी किंवा लोखंडी पेटी.
४)लहान कात्री
५)जंक्शन वायलेट
६) स्वच्छ ,र्निजंतुक केलेला कापूस
७) बँण्डेज पट्टी
८) सुई
९)चिमटा.
*सुचना:-
जखमी व्यक्तीला वरील उपचार माहीत असल्यावरच
करा.कारण अपुरे ज्ञान धोकादायक असते.त्यांने
जखमी व्यक्तीचा जीव जावू शकतो .


   
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.