कापुरचे फायदे


कापूर पूजेसाठी किंवा आरती करताना वापरतात.
पण आरोग्याच्या दृष्टीने हे खूप फायदेशीर आहे. कापूरचा उपयोग अनेक प्रकारच्या आजारांना दूर पळविण्यासाठी केला जातो. कापूर त्वचा, स्नायू
आणि उतींची सूज कमी करण्यात मदत करते.
जुना संधीवाताच्या आजारांपासून सुटका मिळविण्यासाठी कापूर उपयोगी औषध आहे.
कापूरचे तेल खूप फायदेशीर आहे.कापूरचा वापर
अनेक औषधांमध्ये वापर करण्यात येतो. प्राचीन काळातील आपल्या देशातील धार्मिक विधींमध्ये कापराचा वापर केला जातो. कापराचा सर्वाधिक
वापर आरतीत केला जातो.

धार्मिक कारण

शास्त्रानुसार देवी- देवतांनसमोर कापूर लावल्याने
अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमित
पणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा
इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव रहात नाही. कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते.
अशा वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात. कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात
सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या
सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते.

वैज्ञानिक महत्त्व

वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे की ,
कापराच्या सुगंधाने जीवाणू , विषाणू , लहान
किटक नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध
राहते व आजार दूर रहातात.

कापूराचे काही फायदे

सर्दि-पडस व्हायची लक्षणे आसताना एका
रूमालात ३-४ कापूर एकत्र करून त्याचा वास
घेतल्याने सर्दि-पडसे होत नाही.

कापूराचा सुगंध व्यवस्थित श्वासावाटे आत
घेतल्याने तोंडाला घाण वास येत असल्यास
निघून जातो.

कपूराच्या वासाने आपल्या मेंदूतील लेकवस्
नामक रसायन अधिक सक्रीय होते. याचा उपयोग आपल्याला निर्णयक्षमतेत होतो.

कापूराचा रोज ३ वेळा सुवास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखायची क्षमता वाढते.

घरात कापूर रोज लावल्यावे अॉक्सिजन ९-११%
टक्के ईतका वाढतो.

मुठभर कापूर तव्यावर ४० सेकंद तापवून ते एका रूमालात बांधून त्याचा शेक गळ्याला दिल्यास ,
घसा बसला असेल तर बरा होतो. तसेच हा शेक भुवयांच्या वर दिल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.

मुठभर कापूर + दालचीनी + लसूण एकत्र एका
सुती कपड्यात बांधून गाडीच्या बोनेट च्या आत
ही पूडी ठेवल्याने काही वेळ तरी उंदीर व घूशी येत नाहीत.

पण कापूर हा उगाच अति जाळू नये. कारण अति
धूराने डोळे झोंबतात आणि त्याचा वाईट परीणामा भुबुळाच्या पाठील टिशूस् वर होतो.

गरम पाण्यात मीठ व बराच कापूर टाकून त्यात
पाय बुडवून ठेवल्याने दुखाणे कमी होते व
फुगलेल्या शीरा खाली बसतात. ( ५०शी ओलांडलेल्यांना अधिक उपयोगी )

कापूराच्या सुगंधाने एक नवचैतन्य निर्माण होते
मनात.

कापूर, ओवा आणि पेपरमिंट एक सारख्या
प्रमाणात घ्या. त्यांना एका काजेच्या बाटली टाका.
त्या बाटलीला उन्हात ठेवा. थोड्या वेळाने ती बाटली हलवत जा. त्यानंतर त्यातील चार थेंब बत्ताशावर
किंवा साखरेच्या सरबतात टाका. हे जुलाब झालेल्या व्यक्तीला द्या. जुलाब थांबतील.

पोटदुखी आणि अस्वस्थता यात कापूर खूप
फायदेशीर आहे. पोटात दुखत असेल अशावेळी
कापूर, ओवा आणि पेपरमिंट साखरेच्या सरबतात टाकल्यास पोट दुखी नाहिशी होते.

त्वचेसाठी कापूर खूप फायदेशीर आहे.
कापूर कोशिकांना मजबूत करतो. त्यामुळे
त्वचा तजेलदार होते.

स्नायूतील दुखणे कमी करण्यात कापूरची मदत
होते. स्नायू किंवा संधीवातचा आजार असल्यास कापूरचे तेलाने मालीश करा. आराम मिळू शकतो
आणि दुखणे पळून जाते.

खाज आल्यास कापुराचा उपयोग करा. खाज
आलेल्या ठिकाणी कापूर लावा, खाज बंद होते.

संधिवातात रुग्णाला कापूर खूप फायदेशीर आहे. संधिवात कापूरच्या तेलाची मालिश केल्यास आराम मिळतो.

भाजल्यास कापूरचे तेल लावा. जळले किंवा
भाजल्यास कापूराचं तेल खूप उपयोगी आहे.
त्याने आग कमी होते.

कापूर खूप सुगंधी असते त्याचे सुवास आणि
रसायनिक भिन्नता ही देशात होणाऱ्या वृक्षावर अवलंबून असते. कापुराच्या धुराने वातावरण
प्रसन्न आणि अल्लाददायक होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.