स्मार्टफोनची चार्जीग कशी टीकवावी

:स्मार्टफोनच्या बॅटरीनं ऐनवेळी धोका देणं...ही गोष्ट काही आता नवी राहिली नाही...
पण, मोबाईलच्या योग्य वापर करून हा त्रास टाळला जाऊ शकतो आणि मोबाईल बॅटरीची लाईफही वाढते. - वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएस या गोष्टींची तुम्हाला नक्कीच 24 तास गरज नसते. त्यामुळे या सुविधा जेव्हा गरज नसेल तेव्हा बंद करा. त्या मुळे बॅटरीवर चांगलाच फरक जाणवतो.
- बॅकग्राऊंड मध्ये अनेक अॅप्स सुरू राहतात. तेही बॅटरी खातंच असतात. या अॅप्सची संख्या जितकी कमी तेवढं चांगलंच.
लाईव्ह वॉलपेपर किंवा स्क्रीनसेवर मुळे
ही बॅटरी खर्ची पडते.
- स्क्रीनचा ब्राइटनेस ऑटोमॅटिक मोडवर न ठेवत तो स्वत: सेट करा.
स्क्रीन जितकी कमी ब्राईट तितका बॅटरीचा कमी वापर,
ही गोष्ट लक्षात ठेवा.-
जर तुमच्या मोबाईलमध्ये बॅटरी सेव्हिंगचा मोड असेल तर त्याचा वापर नक्की करा. त्यामुळे, तुमची बॅटरी कमी झाल्यास तुमचा 'स्मार्ट' असलेला फोन गैरवापरातील अॅप्स फोन स्वत:च बंद करून टाकतो.
- सर्वात जास्त बॅटरी कोणत्या अॅपसाठी खर्च होते, हे काही दिवसांच्या अंतरानं जरूर चेक करत राहा.
या सर्व उपायां मुळे तुमच्या बॅटरीचं आयुष्य नक्कीच वाढेल... पण, या मुळे ही काही फरक पडत नसेल तर बाजारातून बॅटरी एक्स्टेंडर किंवा पॉवर बँक जवळ बाळगा... जेणे करून ऐन वेळी तुमचा स्मार्टफोन तुम्हाला धोका देणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.