वैज्ञानिक विवाह कुंडली

सध्याचे युग विज्ञान युग आहे .
मानवाने वैज्ञानिक क्षेञात प्रगती साधली
आहे.'जय जवान जय किसान आणि जय विज्ञान' पर्यत वाटचाल केली आहे. चंद्र
मंगळ या ग्रहांवर मानवाने पाय ठेवला आहे.वैज्ञानिक दृष्ट्या मानवाने भौतिक गाणितीय प्रगती सुध्दा  मानवाने साधली आहे.
वैज्ञानिक दृष्टीने मानवाने अनेक अंधश्रध्दा विविध पुराव्यांच्या साह्याने नाहीश्या केल्या आहेत. तरी सुध्दा लोक स्वाभावीकदृष्ट्या लोक काही गोष्टी साठी मुहुर्त,वेळ इ. अंधश्रध्दाळूपणे कृती करत असतात . उदा विवाह, विवाह जमवितांना विज्ञान युगात सुध्दा ज्योतिष शास्त्र  जाणकारांकडे अनेक जांताना दिसतात. मुला-मुलींचे लग्न जमवायचे असल्यास
त्यांची कुंडली मांडली जाते. गुण योग्य आहेत की अयोग्य आहेत हे ज्योतिष्यशास्ञज्ञ  सांगतात.बहुतेक मुला-मुलींच्या जन्म
तारखा,जन्मवेळ अचूक असतीलच याची शास्वती नसते.असे असतांना .गुण पडताळून होकार नकार ठरतो. जर उभय वधू वरपक्षांनी हा विवाह झालाच पाहीजे असा रेटा लावल्यास वधू वरांची लग्नापुरती नावे बदलुन गुण वाढविले जातात.अन् विवाह पार पाडण्यात येतात.बर्याचदा नकार देण्या करता वरपक्षा कडून
गुण मिळत नाही असं सांगण्यात येत. त्या मुळेच आपण या आंधश्रध्देच्या मागे न लागता वैज्ञानिक  कुंडली पहावी
ते कस ते खालील प्रमाणे
१)वजन, उंची इ. वैज्ञानिक नजरेने विचार करावा.

२) मुला- मुलींची रक्तगट तपासणी करुन पुढील अपत्य प्राप्तीला काही अडथळे आहेत का?हे जाणकार
डाँक्टरांच्या साहाय्याने जाणुन घेणे.

3) वय तपासुन पाहणे.

४)त्याच्या वयातील अंतर योग्य असावे .

५) HIV ची तपासणी करुन पाहावी.

६) मुलां मुली ला काय व्यसन आहे ते       जाणुन घेणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.