वाट
ही वाट चालतांना असेही घडून जाते
वाटेतल्या कुणाशी ,नाते जडून जाते !
अजाणत्या मनाची, अजाण रित वेडी
न जाणता कुणाच्या ,स्वप्नि गढून जाते
येवुन चोरपावलांनी , चोरुन ह्दय कुणी
चोरटे पाखरू वेडे उडून जाते
मोसमांचे उधळूनी रंग सारे
उमलते ते कोणी खुडून नेते
वाटेतल्या त्या घराशी वाट पाहणारे
नसले तरीही आता पाऊल अडून जाते
ही वाट चालतांना असेही घडून जाते
कुणी हसुन जाते , कुणी रडून जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: