आशा

सर्वांना आपलंस करतांना
कुणीच नाही झालं माझं
नात्याच्या या गुंत्यांमध्ये
जीवनाच झालय ओझं
             अलीकडे तुझ्या वागण्यात
             किती रे बदल झालाय !
             हातात मोगरा असतांनाही
             तुला रातराणीचा गंध हवाय.
किती वाट पहायची मी
यायला तू उशीर केला
घरट्यातला पक्षी आता
घरटं सोडून उडून गेला
              माझ्या कुंकवाशी तुझं नातं
              जन्मोजन्मीचं असावं
              घालतांना गळ्यात मंगळसूञ
              तू डोळ्यात पाहून हसावं
कितीही संकटे आली तरी
हात तुझा असावा हातात
मृत्युला जवळ करतानाही
देह विसावा तुझ्या मिठीत......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.