साल्हेर चा इतिहास बागलाण ची शान

  इतिहासावर नजर टाकल्यास शिवरायांनी १६७१ मध्ये
 बागलाणची आवघङ मोहीम हाती घेतली  होती.वेढा टाकून साल्हेर
 घेण्यास उसंत नसल्यामुळे मावळ्यांनी कडा चढूनच किल्ल्यात प्रवेश
 मिळवला. खुद्द किल्लेदार फत्तुलाखान ठार झाला व साल्हेरवर
 मराठी निशान लागले दिवस होता ५ जाने.१६७१. पुढे साल्हेर
पुन्हा मिळवण्यासाठी मोगलांनी परत आँक्टो.१६७१ मध्ये गडाला
वेढा टाकला. रणराज शिवराय ,मोरोपंत व प्रतापराव गुर्जरया तिघांनी
मिळून अंत्यत कल्पकतेने मोगली सैन्याचा पाडाव केला.
 या युद्धात सुमारे ४० हजार मराठी फौज सामीर झाली होती.

 पण या युद्धात शिवरायांचा मोठा धारकरी सूर्यराव काकडे
 जंबुरियाचा गोळा लागून धारातीर्थी पडले.या संपुर्ण
लढाईचे वर्णन सभासदाच्या बखरीत आपणास वाचावयास
 मिळते. साल्हेरच्या या लढाई इतके सुनियंञित व सुसूञ
 युध्दतंञ हिंदुस्थानाच्याया आधीच्या इतिहासात कोणीच
 वापरले नव्हते . मोगलांविरुध्द पुढे तीन दशके
 महाराष्ट्रात गडा-गडांवर जो मोठ्या प्रमाणात रणसंग्राम
 झाला, त्याला हे साल्हेरचे युध्द प्रेरणात्मक होते. चला तर म
ग या बागलाणातील साल्हेर मोहिमेला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.