पुण्यातही महाराष्ट्र बँकेच्या शाखेतील एका लाॅकरमध्ये तब्बल 10 कोटींची रोकड आयकर विभागाच्या हाती लागलीये

१५ डिसेंबर : 
नोटबंदीनंतर देशभरात कोट्यवधीचे घबाड जप्त होत आहे. पुण्यातही महाराष्ट्र बँकेच्या शाखेतील एका लाॅकरमध्ये तब्बल 10 कोटींची रोकड आयकर विभागाच्या हाती लागलीये. एका लॉकरमध्ये ही रोकड सापडली असून मोजदाद सुरू आहे. ही रोकड एका परदेशी कंपनीची असल्याचं कळतंय.पुण्यातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेवर आयकर विभागाने छापा टाकला. एका परदेशी कंपनीचे बँकेमध्ये 15 लॉकर आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये ते लॉकर वेळोवेळी वापरण्यात आले. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिका-यांना संशय बळावाला. त्यांनी आयकर विभागाला याबद्दल कळवले. त्यानुसार छापा टाकण्यात आला. या सर्व 10 कोटीच्या नव्या नोटा असल्याचं कळतंय. ही रक्कम थोडी कमी जास्त होऊ शकते. सर्व लॉकरची झाडाझडती सुरू असून नोटांची मोजणी चालू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.