सलमान शाहरुख च्या चाहत्याची प्रतिक्षा संपली
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि दबंग सलमान खान पुन्हा एकदाएकत्र येणार आहेत. ऑनस्क्रीन शेअर केल्यानंतर आता हे दोघं अनेक वर्षांनंतर एक शो होस्ट करणार असल्याची माहिती मिळते आहे. मिळालेल्या माहिती नुसार, सलमान आणि शाहरुख या वर्षी स्क्रीन अवॉर्ड्सचे होस्टिंग करताना दिसणार आहेत. सलमान आणि शाहरुखने एकत्र अवॉर्ड शो होस्ट करणे ही बाब बॉलिवूडसाठी खूप मोठी आहे. यामुळे होस्टिंगच्या स्क्रीप्ट वर देखील खूप काम सुरू आहे. मोठ्या गॅप नंतर किंग खान आणि दबंगच्या चाहत्यांना केवळ हे दोघं एकत्र दिसणार नाहीत,तर अनेक मनोरंजक किस्से आणि विनोद ऐकण्याची देखील संधी मिळणार आहे. सोशल मीडियावर 'मेरे करण-अर्जुन आयेंगे' यावरील जोक्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत. मात्र, स्क्रीन अवॉर्ड्स शोमुळे हा विनोद आता सत्यात उतरणार असून एकेकाळी ऑन स्क्रीन शेअर केलेले 'करण-अर्जुन' म्हणजेच सलमान- शाहरुख शोच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. शाहरुख -सलमानने 'करण-अर्जुन' सिनेमा मध्ये एकत्र काम केले होते. या सिनेमामध्ये राखी यांनी त्यांच्या आईची भूमिका निभावली होती. 'मेरे करण-अर्जुन आयेंगे' हा डायलॉग त्या सिनेमामध्ये अनेकदा बोलताना दिसत आहेत. यातच सलमान आणि शाहरुख यांच्या एकत्र येण्याचा उल्लेख केला की, आपसुकच हा डायलॉग सर्वांच्या ओठांवर येतो.उशिराने का होईना पण अखेर 'करण-अर्जुन'च्या आईची हाक स्क्रीन अवॉर्ड्सने ऐकली. काही वर्षांपूर्वी सलमान आणि शाहरुखच्या नात्यात आलेली कटुता आता संपुष्टात आली आहे. दोघंही एकमेकांच्या सिनेमांचे कौतुक करत आहेत, प्रमोशन देखील करत आहेत शिवाय आता दोघं एकत्र एक अवॉर्ड शो होस्ट करताना दिसणार आहेत. दरम्यान, नुकतेच काही दिवसांपूर्वी शाहरुखने सलमानच्या घरी जाऊन त्याची भेटदेखील घेतली होती. यावेळी शोसंदर्भात दोघांनी चर्चा केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: