व्हाट्सअँप वर पाठवलेला चुकीचा संदेश बदलता येतो

मुंबई : व्हॉट्सअॅप वरुन पाठवलेला मेसेजे धनुष्यातील बाणासारखा असतो. जो एकदा पाठवल्यावर मागे घेता येत नाही. म्हणजेच एखादा मेसेज अर्धवट असेल वा चुकीचा असेल तर एकदा सेंड झाल्यास तो मागे घेता येत नाही. 

तसेच घाईच्या वेळेसही एखाद्याला मेसेज पाठवायचा असल्यास तो भलत्याच व्यक्तीला सेंड होतो. यामुळे आपली फजिती होतेच. हे टाळण्यासाठी व्हॉट्स अॅपने नवे फीचर आणलेय. ज्यात तुम्ही चुकून पाठवलेला मेसेज एडिट करु शकता. 

मीडिया रिपोर्टनुसार, लवकरच व्हॉट्सअॅपवर अशा प्रकारचे फीचर येत आहे. ज्यामुळे तुम्ही चुकून पाठवलेला मेसेज एडिट करु शकता. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला तुम्ही चुकून मेसेज केला तर तो एडिट करु शकणार आहात. कंपनीने या फीचरचे टेस्टिंग सुरु केलेय. दरम्यान हे नवे फीचर व्हॉट्सअॅप
मध्ये कधी येणार याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.