औसा नगरपालिके मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली

लातूर, दि. १५ - नगरपालिका निवडणुकांची दुस-या टप्प्यांची मतमोजणी सुरु झाली असून लातूरच्या औसा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. औसामध्ये ७५.५८ टक्के मतदान झाले होते. राष्ट्रवादी काँग्रसेचे अफसर शेख नगराध्यक्षपदी निवडून आले आहे. औसा नगरपालिकेत राष्ट्रवादीला सर्वाधिक १२, काँग्रेसला २ आणि भाजपाला ६ जागा मिळाल्या आहेत. दुस-या टप्प्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली सुरुवात केली आहे. नगरपालिकेच्या पहिल्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची थेट चौथ्या स्थानावर घसरण झाली होती. मिनी विधानसभा समजल्या जाणा-या नगरपालिकेच्या पहिल्या टप्प्यात भाजपाने सर्वाधिक ३२ नगरपालिका जिंकून ५२ नगराध्यक्ष निवडून आले. लातूर जिल्ह्यातील औसा, उदगीर, निलंगा आणि अहमदपूर नगरपालिकेसाठी बुधवारी मतदान झाले. लातूरमध्ये ४ नगरपालिकांसाठी एकूण ७०.४५ टक्के मतदान झाले. अहमदपूर नगरपालिका, नगराध्यक्षपदी बहुजन विकास आघाडीच्या अश्विनी कासनाळे,  राष्ट्रवादी काँग्रेसला झटका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.