चुकीच्या पद्धतीने जाहीरात केल्याने पतंजली आयुर्वेद कंपनीला 11 लाखांचा दंड
इतर कंपन्यांच्या प्रकल्पात तयार झालेली उत्पादने आपले लेबल लाऊन विक्री केल्याने आणि त्याची चुकीच्या पद्धतीने जाहीरात केल्याने पतंजली आयुर्वेद कंपनीला 11 लाखांचा दंड ठोठावला आहे.हरिद्वार येथील स्थानिक न्यायालयाने रामदेवाबाबांच्या कंपनीला एकमहिन्यात या रकमेची भरपाई करण्याचे आदेश दिले आहेत.न्यायाधीश ललीत नारायण मिश्रा यांनी हे आदेश दिले आहेत. पतंजली कंपनी सध्या आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यात अग्रेसर असून, यानिर्णयामुळे त्यांच्या उत्पादनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.याप्रकरणी जिल्हा फूड सेफ्टी विभागाने डिसेंबर 2012 मध्ये कंपनी विरोधात खटला दाखल केला होता. विभागाच्या रुद्रपुर प्रयोगशाळेतील गुणवत्ता चाचण्यांमध्ये मोहरी तेल, मीठ, बेसन आणि मधाचे नमुने अयशस्वी ठरले होते. कंपनीने फूड सिक्युरिटी नॉर्म्स मधील कलम 52-53 आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड(पॅकेजिंग अँड लेबलिंग) रेग्युलेशनमधील कलम 23.1(5) चा भंग केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: